Powered By Blogger

Friday, June 14, 2013

वाट........

ती  संध्याकाळ खूप सोनेरी होती …
आकाशी सर्वत्र नारंगी आणि काळ्या रंगाच्या छटा उधळलेल्या होत्या …
ती नेहमी प्रमाणे तिच्या खिडकीत चहा घेत ते नारंगी काळे आकाश निहाळत बसलेली……
त्याचं नारंगी आकाशाप्रमाणे तिचही मन अश्याच गर्द रंगांनी भरलेल  असल्याचा आभास तिला झाला …
कारण एव्हा तिच्या मनातले खेळ तिला काळेनाशे झाले होते …
तिच्या मनातला गुंता तिला सुटेनासा होवून चुकला होता ….
मनात आणि तिच्यात एकमेकांवर दोषारोपण करण्याच्या वेगळ्याच भांडणाला सुरवात झाली होती ….
यातून मार्ग काढण्यासाठी या उन्हाळ्याने वृक्ष झालेल्या तिच्या मनाला एका पावसाची गराझ होती ……… इतक्यातच कुठून  पाउस तिला भेट द्यायला तिच्या खिडकीत येवून धडकला ……….
तिच्या खिडकीच्या काचाप्रमाणे  सर्व झाड फुल रस्ते आणि घरांची छपरे स्वच्छ धुवून निघालि ……
ते नारंगी गर्द काळे  आकाश  स्वच्छ पांढरे झाले ……………….
जॆ पूर्वी त्या काचातून धुसर दिसत होते ते स्पष्ट दिसू लागले होते ……
ती विचारात पडली………
तीच्या मनातले वेगळे गर्द काळे नारंगी रंग अशेच धुवून निघाले आस्ते तर ?!………
त्या काचाप्रमाणे  सर्व काही स्पष्ट दिसू लागलं असत तर !!!! …
आणि पुढे त्या स्वछपांढऱ्या  आकाशाप्रमाणे तिचेही मन स्वच्छ झाले असते तर?!!!!!  ………
उत्तर तिच्या समक्ष नसले तरी, आत्ता पाउस तिच्या खिडकीत होता ….
म्हणून तीही तिच्या मनातलं वादळ थांबून पाउस पडण्याची वाट पाहू लागली ………कोणास ठावूक?!!!,
पुन्हा असच कधी खिडकीत चहा पीत वाट पहात असताना तिच्या मनातल्या  खिडकीत  पाउस येवून धडकेल!!!  :)  …………… 

No comments:

Post a Comment