Powered By Blogger

Sunday, January 27, 2013

तरी ती तशीच उभी तिच्या दारी ...

पुन्हा एका सायंकाळी आकाशी ढग दाटून आले .......
जशे ते पूर्वी तिच्या मनात दाट्त होते , घनदाट काळे ढग .....

ती सायंकाळ नवीन नव्हती तिच्यासाठी ,
तरी ती तशीच उभी तिच्या दारी .....

वारा सैरा वैरा पळत होता , कधी छपरातून कधी झाडातुन,
तर कधी तिच्या केसातून तिच्या गालाला स्पर्श करत होता,
तरी ती तशीच उभी तिच्या दारी ...

ती डोळे भरून ते काळे ढग पीत होती, हृदयात ते काळ विष पुन्हा साठवत होती,
आता वीज तिच्या अन्तः कर्णाचे तुकडे करणार होती,
तरी ती तशीच उभी तिच्या दारी ...

तीच्या हृदयाचे ठोके आता त्या गर्जणाऱ्या वादळाशी संवाद साधू लागले,
ते वादळ तिच्या मनात घर करू लागले,
तरी ती तशीच उभी तिच्या दारी ...

सरी आता तिच्यावर आघात करू लागल्या,
तिच्या डोळ्यातून तिच्या हृदयात,
तिच्या आश्रुतून तिच्या गालावर घसरू लागल्या ,
तरी ती तशीच उभी तिच्या दारी ...

पुन्हा त्या वादळात ती हरवून गेली,
स्वतःच्या दुखःत  चिंब भिझुन गेली,
तरी ती तशीच उभी तिच्या दारी ...